सांगलीच्या खासदारांचा पक्षांतराबद्दल मोठा खुलासा

0
85

सांगली (प्रतिनिधी) : कोणाला काहीही वाटले, तरी मी भाजपमध्येच राहणार आहे. मी जिल्ह्यातील कार्यक्रमांना हजेरी लावत आहे. मी जिल्ह्यातील अन्य कोणत्या कार्यक्रमात गेलो म्हणून मी भाजप सोडून कुठेही जाणार नाही. मी भाजपमध्येच राहणार अशी, प्रतिक्रिया खासदार संजय पाटील यांनी दिली.

खासदार पाटील भाजपमधून बाहेर पडणार असल्याची चर्चा आहे. याबद्दल प्रश्न विचारला असता, माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना खासदार संजय पाटील यांनी मला पक्षातून कोणी घालवायला बसले असतील किंवा कोणाला वाटत असेल मी बाहेर जावे, तर तसं काहीही होणार नाही. मी भाजपमध्येच राहणार आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील हे आमदार गोपीचंद पडळकर यांना काय बोलले याबाबत मला काही माहीत नाही, असेही ते म्हणाले.