सावरवाडी (प्रतिनिधी)  : केंद्र शासनाच्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी आणि दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वयक समितीतर्फ  कोल्हापूर जिल्ह्यात दि. १५ ते २२ डिसेंबर अखेर संघर्ष यात्रेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य किसान सभेचे राज्य कौन्सील सहसचिव नामदेव पाटील यांनी आज (शनिवारी) दिली.

८ दिवस चालणारी ही  संघर्ष यात्रा १२ तालुक्यातून जाणार आहे. शेतकऱ्यांचे प्रबोधन, ठिकठिकाणी जाहीर सभा, माहितीपट आदी कार्यक्रम होणार आहेत.  वडगाव येथे शुभारंभ करून ही संघर्ष यात्रा संपूर्ण जिल्हाभर जाणार आहे. कृषी कायद्यामुळे शेतीमालाला रास्त भाव मिळणार नाही. नवी दिल्लीमधील शेतकरी आंदोलन गावा पातळीपर्यंत उग्र करण्यात येणार आहे, असेही पाटील यांनी पाटील यांनी सांगितले.