वीज कनेक्शन तोडू देणार नाही : ‘आप’चा इशारा

0
64

कोल्हापूर (प्रतिनिधी) : वाढीव वीज दर मागे घ्यावेत व लॉकडाऊन काळातील वीज बिलं माफ व्हावीत अशी मागणी सर्व नागरिक करत आहेत. परंतु या मागणीची दखल अद्याप राज्य सरकारकडून घेतली गेलेली नाही. उलट महावितरणने काढलेल्या पत्रकात थकबाकी असलेल्या ग्राहकांचे वीज कनेक्शन खंडित करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

या निर्णयामुळे ग्राहकांमध्ये असंतोष पसरला आहे. आम आदमी पार्टीनेही सरकारच्या विरोधात संताप व्यक्त केला आहे. कोणीही वीज कनेक्शन तोडायला आल्यास पक्षाच्या वतीने त्याला रोखण्यात येणार असल्याचा इशारा ‘आप’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी दिला आहे.