संदीप मागाडे खूनाचा तपास लवकरात लवकर करावा : आ. प्रकाश आवाडे

0
76

इचलकरंजी (प्रतिनिधी) : कबनूरमधील संदीप मागाडे यांच्या खूनाचा तपास पोलिसांनी लवकरात लवकर करून संशयित गुन्हेगारांना कठोर शासन करावे. तसेच मागाडे कुटुंबियांना न्याय द्यावा, अशा सूचना आ. प्रकाश आवाडे यांनी अप्पर पो.अ. जयश्री गायकवाड यांना दिल्या.

गेल्या आठवड्यात ग्रामपंचायत निवडणूक वादातून संदीप मागाडे या युवकाचा खून  करण्यात आला. या प्रकरणी १४ जणांविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. या संदर्भात आवाडे यांनी मागाडे कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. तसेच मागाडे कुटुंबीयांसह जयश्री गायकवाड यांची भेट घेतली. यावेळी मागाडे कुटुंबियांनी संशयित आरोपींना तातडीने अटक करुन त्यांना कठोरातील कठोर शासन करण्यात यावे, अशी मागणी केली.

यावेळी ग्रा.पं. सदस्या शोभा पोवार, मनिषा कांबळे, पिंका सुटुरे, नारायण फरांडे, पवन मागाडे, नितीन कामत, मधुकर मणेरे, बबन केटकाळे, सत्यम कांबळे, सुहास कांबळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.