संदीप देसाई यांनी उत्तरची पोटनिवडणूक लढवावी : निलेश रेडेकर

0
392

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर उत्तर विधानसभेची जागा चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे रिक्त झाली होती. निवडणूक आयोगाने या जागेच्या पोटनिवडणूकीची दृष्टीने जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून माहिती मागीवली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप, शिवसेना पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. यासाठी आपचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी उत्तरची पोटनिवडणूक लढवावी असा आग्रह पदाधिकाऱ्यांनी बैठकीत धरला.

या बैठकीत, पोटनिवडणूकीच्या निमित्ताने कोल्हापूरच्या राजकारणात नेत्यांची सोय बघण्याचे काम सुरू आहे. विधानपरिषद, जिल्हा बँक निवडणुकीत नेत्यांनी मतदारांना विचारात न घेता बिनविरोध करण्याचा डाव आखला. या बिनविरोधच्या राजकारणाला ठाम विरोध करण्याची भूमिका ‘आप’च्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीत बोलून दाखवली. उत्तरच्या मतदारांनी त्यांचा लोकप्रतिनिधी निवडून द्यावा, यासाठी निवडणूक होणे गरजेचे आहे. आपचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी उत्तरची पोटनिवडणूक लढवावी असा आग्रह पदाधिकाऱ्यांनी बैठकीत धरला. यासंबंधित प्रस्ताव पक्षाच्या वरिष्ठांकडे पाठवणार असल्याचे आपचे जिल्हाध्यक्ष निलेश रेडेकर यांनी सांगितले.

यावेळी युवाध्यक्ष उत्तम पाटील, शहर उपाध्यक्ष संतोष घाटगे, संघटनमंत्री सूरज सुर्वे, महिला शहराध्यक्षा अमरजा पाटील, शहर युवाध्यक्ष मोईन मोकाशी, विशाल वठारे आदी उपस्थित होते.