मडगाव स्फोट प्रकरणी सनातनचे निर्दोषत्व सिद्ध

0
41

गोवा (वृत्तसंस्था) : मडगाव स्फोट प्रकरणात सनातनच्या ६ साधकांना गोवण्याचा प्रयत्न गोव्यातील तत्कालीन काँग्रेस शासनाने केला होता. या साधकांना चार वर्षे अकारण कारावास भोगायला लागला होता. मात्र सत्र न्यायालयाने सनातनच्या या सर्व साधकांची निर्दोष मुक्तता केली होती.

याबाबतच्या अपिलावर सुनावणी करताना आज (रविवार) मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने सत्र न्यायालयाचा निकाल कायम ठेवत सर्व साधकांना निर्दोष मुक्त केले आहे. याविषयी, ‘आम्ही न्यायालयाच्या या निकालाचे स्वागत करतो. या निकालामुळे सनातन संस्थेचे निर्दोषत्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. भगवा आतंकवादाचे मिथक प्रचारित करणार्‍यांसाठी ही सणसणीत चपराक आहे.’, अशी प्रतिक्रिया सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस यांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here