सनातन संस्था, हिंदू जनजागृती समितीतर्फे शुक्रवारी ११ भाषांत ऑनलाईन ‘गुरुपौर्णिमा महोत्सव !

0
14

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राष्ट्र आणि धर्म संकटात असताना धर्मसंस्थापनेचे कार्य गुरु-शिष्य’ परंपरेने केले आहे. सध्याही समाज, राष्ट्र आणि धर्म यांची स्थिती दयनीय झाली आहे. अशा वेळी जनतेचा छळ करणार्‍या लोकशाहीतील दुष्प्रवृत्तींच्या विरोधात लढणे आणि रामराज्यासारख्या ‘हिंदू राष्ट्रा’ची स्थापना करणे ही काळानुसार श्रीगुरुसेवाच आहे. या उद्देशाने २३ जुलै रोजी सनातन संस्था अन् हिंदू जनजागृती समिती यांच्या विद्यमाने देशभरात ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा केला जाणार आहे. कोरोना महामारीमुळे यंदा ऑनलाईन कार्यक्रम होणार असल्याची माहिती सनातन संस्थेने दिली आहे.

मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, कन्नड, तेलुगु, तमिळ, पंजाबी, बंगाली, ओडिया आणि मल्याळम् या ११ भाषांमध्ये २३ जुलैला ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सवांचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या महोत्सवांत श्रीगुरुपूजन, सनातन संस्थेचे संस्थापक जयंत आठवले यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा संग्रहित भाग, स्वसंरक्षण प्रात्यक्षिके आपत्काळाच्या दृष्टीने करावयाची सिद्धता (चलचित्र), तसेच आपत्काकाळात हिंदूंचे रक्षण आणि हिंदू राष्ट्राची स्थापना याविषयी वक्त्यांचे मार्गदर्शन होणार आहे.

गुरु म्हणजे काय, गुरूंचे जीवनातील महत्त्व, गुरुकृपा कार्य कशी करते, त्यासाठीचे मार्गदर्शन या महोत्सवात होणार आहे. मराठी भाषेतील ‘ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सव’ हा २३ जुलैला सायंकाळी ७ वाजता होणार असून तो ‘यू-ट्यूब’वर पाहता येईल. त्याच्या लिंक्स पुढीलप्रमाणे :
Youtube.com/SanatanSanstha, www.sanatan.org/mr/