टोप (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील संभापुरचे लोकनियुक्त सरपंच प्रकाश झिरंगे यांना डॉक्टरेट पदवी देण्यात आली. त्यांना एल्फस राज्य सरकार विश्वविद्यालय, दिल्ली यांच्यावतीने कर्तव्यदक्ष सरपंच आणि विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

झिरंगे यांनी संभापुर गावात स्वच्छता, पाणी पुरवठा ,शिक्षण, डिजीटल अंगणवाडी, वैकुंठधाम, रस्ते, पाणलोट विकास, वृक्षारोपण आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. यासाठी स्मार्ट व्हिलेज. आर. आर. पाटील सुंदर गांव पुरस्कार. आदर्श सरपंच अशा अनेक पुरस्कारांनी आजपर्यंत झिरंगे यांना गौरविण्यात आले आहे.

यावेळी संभापुरचे माजी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विजय भोसले, तानाजी भोसले, सुनिल झिरंगे, सुभाष कोकाटे आदी मान्यवर उपस्थित होते.