Published October 24, 2020

चंदगड (प्रतिनिधी) : चंदगड तालुक्यात नुकसानभरपाईपासून वंचित राहिलेल्यांना भरपाई देण्यासाठी प्रयत्न करू. आमचे नेते ना. सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली चंदगड तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहोत. कोणतेही विकासकाम थांबणार नाही, अशी ग्वाही संभाजीराव देसाई (शिरोलीकर) यांनी मांडेदुर्ग (ता. चंदगड) येथील सत्कार समारंभप्रसंगी दिली.

पालकमंत्री ना. सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि काँग्रेसचे नूतन तालुकाध्यक्ष संभाजीराव देसाई (शिरोलीकर) यांच्या नेतृत्वाखाली नुकसानग्रस्त पाहणी दौऱ्यांचा आणि शेतकऱ्यांच्या भेटीगाठीचा कार्यक्रम सुरू आहे. आज (शनिवार) किणी, नागरदळे, कडलगे बु., कडलगे खुर्द, ढोलगरवाडी, सुंडी, करेकुंडी, मांडेदुर्ग, मौजे कारवे आदी गावांचा दौरा आयोजित करण्यात आला आहे. या दौऱ्यात अनेक गावांमध्ये देसाई यांचा तालुकाध्यक्षपदी निवड झालेबद्द्ल सत्कार करण्यात आला.

यावेळी माजी सरपंच सदानंद पाटील, प्रा. भरमाना पाटील, जयवंत शिंदे, सुबराव गुंडप, संभाजी चौथे, रामचंद्र पाटील, धोंडिबा जोशीलकर यांचेसह ग्रामस्थ उपस्थित होते.

September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023