संभाजीराजे यांनी दिली छ. शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालयाला भेट…

0
15

मुंबई (प्रतिनिधी) : छत्रपती संभाजीराजे यांनी आज मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयास भेट दिली. यावेळी त्यांनी येथील अनेक ऐतिहासिक आणि दुर्मिळ वस्तूंसह छ. शिवाजी महाराजांच्या अत्यंत दुर्मिळ अशा ऐतिहासिक ‘होन’ची पाहणी केली.

गेल्या काही दिवसांपासून राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण छ. संभाजीराजे यांच्याभोवती फिरत आहे. सामान्य कार्यकर्त्यापासून ते बड्या नेत्यांपर्यंत अनेक दावे प्रतिदावे सुरू आहेत. मात्र, हे सर्व सुरू असताना खुद्द संभाजीराजे मात्र पुण्याच्या पत्रकार परिषदेनंतर जाहीर ठिकाणी अथवा माध्यमांसमोर आलेले नाहीत. या पार्श्वभूमीवर आज अचानक छत्रपती संभाजीराजे यांनी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयास भेट दिली. यावेळी वस्तूसंग्रहालयाचे क्युरेटर, अधिकारी उपस्थित होते.