Published August 8, 2023


सांगोला ( प्रतिनिधी ) ‘काय झाडी, काय डोंगार’ असं विधान करत राज्यभरात चर्चेत आलेले सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मतदार संघात संभाजीराजे छत्रपती यांनी सभा घेतली. स्वराज्य संघटनेने जोरदार शक्तीप्रदर्शन करत ही सभा घेतली आहे. त्यामुळे आमदार पाटील यांना ही धोक्याची घंटा ठरु शकते.


मिळालेल्या माहितीनुसार संभाजीराजे छत्रपती हे सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. दरम्यान त्यांनी सोमवारी रात्री सांगोल्यात विराट सभा घेत राज्य सरकारवर सडकून टीका केली. तसेच सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या कारभारावरुन ही टीकास्त्र सोडले. या सभेला स्थनानिक नागरीकांनी केलेली गर्दी पाहता काठावर निवडून आलेल्या आमदार पाटील यांच्यासाठी ही डोकेदुखी ठरु शकते.


या सभेला संबोधित करताना संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यात इतक्या खालच्या पातळीचं राजकारण कधी पहिलं नसल्याचा घणाघात करत राज्य सरकारला फटकारलं.तसेच जे चक्की पिसिंग म्हणत होते, तेच आज मांडीला मांडी लावून बसलेत, असा टोलाही संभाजीराजेंनी लगावला.

September 23, 2023
September 23, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023