जय भानोबा व्यापारी असोसिएशनच्या अध्यक्षपदी संभाजी लाड

0
271

धामोड (प्रतिनिधी) : राधानगरी तालुक्यातील धामोड येथील जय भानोबा व्यापारी असोसिएशनच्या अध्यक्षपदी संभाजी बापुसो लाड यांची तर उपाध्यक्षपदी विठ्ठल शंकर पाटील यांची बिनविरोध निवड झाली. मावळते अध्यक्ष दीपक भिकाजी तेली आणि उपाध्यक्ष शिवाजी विष्णू चव्हाण यांचा कार्यकाळ संपल्याने या नूतन निवडी करण्यात आल्या. असोसिएशनच्या बिनविरोध निवडीची परंपरा कायम राखली आहे.

‘लाईव्ह मराठी’शी संवाद साधताना नूतन अध्यक्ष संभाजी लाड म्हणाले की, तुळशी-धामणी परिसरातील ही सर्वात मोठी व्यापारी संस्था असून या संस्थेचे वार्षिक उलाढाल कोटीच्या घरात आहे. आजपर्यंत संस्थेने पारदर्शक कारभार केला असून सर्वांना विश्वासात घेऊन यापुढे कार्यभार सांभाळला जाईल. यावेळी संस्थेचे सर्व संचालक मंडळ आणि सभासद उपस्थित होते.