पन्हाळा (प्रतिनिधी) : शिवजयंतीनिमित्त पन्हाळागडावरुन शिवज्योत नेण्यास पन्हाळा नगराध्यक्षांनी परवानगी दिलेली नाही. यामुळे शिवभक्तांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. हा बंदी आदेश मागे घ्यावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. याबाबतचे निवेदन आज (शुक्रवार) तहसीलदार, पोलीस निरिक्षक, नगराध्यक्ष यांना देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, गडावर इतर राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रम गडावर साजरे केले जात आहेत. मग शिवज्योतीलाच विरोध का ? कोरोनामुळे जर हा बंदी आदेश काढलेला असेल तर योग्य नियम घालून नगरपरिषदेने शिवज्योत गडावरून घेऊन जाण्यास परवानगी द्यावी. शिवभक्तांच्या भावनांचा विचार करून बंदी आदेश लवकरात लवकर लवकर मागे घ्यावा. अन्यथा, संभाजी ब्रिगेडच्या पन्हाळा शाखेचे कार्यकर्ते सर्व शिवभक्तांना शिवज्योत गडावरून घेऊन जाण्यास सहकार्य करेल. त्या वेळी काही पेचप्रसंग उद्भवल्यास प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा देण्यात आला आहे.