कोल्हापूर (प्रतिनिधी) :  संभाजी ब्रिगेडने आंदोलनाद्वारे संभाजी बिडी नाव बदलण्यास भाग पाडले. हे आंदोलन यशस्वी केल्याबद्दल संभाजी ब्रिगेड कोल्हापूरच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार संभाजी ब्रिगेड पुणे जिल्ह्याच्या वतीने छ. शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.

संभाजी महाराजांच्या नावाने बिडी विकणाऱ्या साबळे कंपनीच्या गाड्या अडवून माल विक्री करण्यास मनाई करण्यात आली होती. तर संभाजी बिडीचे नाव बदलण्यासाठी साबळे कंपनी विरोधात आंदोलन तसेच पाठपुरावा केला होता. यामुळे संभाजी बिडीचे नाव बदलण्यात आले होते. याबद्दल कोल्हापूर जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील, अभिजीत कांजर, निलेश सुतार, विकी जाधव, अभिजित भोसले, भगवान कोईगडे, विक्रमसिंह घोरपडे, अमरसिंह पाटील, मदन परीट, उमेश जाधव यांचा संभाजी ब्रिगेड पुणे जिल्ह्याच्या वतीने प्रदेश संघटक संतोष शिंदे, संभाजी ब्रिगेडचे नेते विकासआण्णा पासलकर यांच्या उपस्थितीत छ. शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी पुणे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे, कार्याध्यक्ष प्रशांतजी धुमाळ, हवेली तालुकाध्यक्ष शिवाजी पवार,साजीद सय्यद,निलेश ढगे, महिनी रणदिवे, सनी उर्फ बाळू थोपटे,जोती पेंढारकर, सुमेध गायकवाड, रमेशमामा गणगे, हनुमंत गुरव, हनुमंत शिंदे तसेच संभाजी ब्रिगेड चे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.