संभाजी ब्रिगेडकडून रस्त्यावरील मूर्ती विक्रेत्यांचा सन्मान  

0
242

कोल्हापूर (प्रतिनिधी) : संभाजी ब्रिगेडच्या वतीने छ. शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवरायांच्या मूर्त्या रस्त्यावर विक्री करणाऱ्या विक्रेत्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रुईकर कॉलनी, रंकाळा तलाव, संभाजीनगर परिसरातील मूर्ती विक्रेत्यासह मूर्ती कारागिऱांच्या परिवाराला नवीन कपडे भेट देण्यात आले.

छ. शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मूर्ती, पुतळे व प्रतिमांची मागणी असते. स्थानिक कलाकार महापुरुषांच्या मूर्ती, पुतळे कमी प्रमाणावर तयार करतात. पण रस्त्याकडेला विक्री व निर्मिती करणारे कारागीर स्वतः पदरमोड करून शिवरायांच्या मूर्ती अल्प किंमतीत विकतात. त्यामुळे या विक्रेत्यांच्या कार्याचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील, मराठा सेवा संघाचे शहर कार्याध्यक्ष प्रशांत सासणे, पृथ्वीराज राणे, ब्रिगेडचे शहराध्यक्ष अभिजीत भोसले, निलेश सुतार, शाहीर दिलीप सावंत, भगवान कोईगडे, अभिजीत कांजर, सुजय देसाई, शर्वरी मानगावे, मदन परीट, बबलू ठोंबरे आदी उपस्थित होते.