आजपर्यंतच्या इतिहासात ऊसाच्या उच्चांकी गाळपाचा टप्पा पार : समरजितसिंह घाटगे

0
82

कागल (प्रतिनिधी) : शाहू कारखान्याने आजपर्यंतच्या इतिहासात ऊसाच्या उच्चांकी गाळपाचा टप्पा पार केला. यापूर्वीच्या हंगामातील स्वतःचा एकूण गळीतचा विक्रम मोडला असून चालू गळीत हंगाम २०२०-२१ मध्ये ११२ व्या दिवशी ८ लाख २० हजार मे. टन इतक्या ऊसाचे गाळप करून नवा इतिहास रचला आहे. यामध्ये सभासद, कर्मचारी, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा मोलाचा वाटा असल्याचे कारखान्याचे चेअरमन समरजितसिंह घाटगे यांनी काढले.

यावेळी राजे समरजितसिंह घाटगे म्हणाले की, एक उपक्रमशील साखर कारखाना म्हणून शाहूचा देशभरात नावलौकिक होत आहे. व्यवस्थापनाने  चालू गळीत हंगामासाठी १० लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. चालू गळीत हंगाम मार्च २०२१ अखेर चालेल असा अंदाज आहे. यामध्ये सभासद, शेतकरी यांच्या सहकार्याने निश्चित केलेले उध्दिष्ठ आपण पार पाडू, असा विश्वासही घाटगे यांनी व्यक्त केला.

यावेळी  कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांच्यासह अधिकारी, कर्मचारी  उपस्थित होते.