कागल (प्रतिनिधी) : यंदाच्या गळीत हंगामासाठी देशात सर्वप्रथम एफआरपी  एकरकमी देण्याची घोषणा शाहू साखर कारखान्याचे चेअरमन समरजितसिंह घाटगे यांनी केली. या निर्णयाबद्दल शाहू साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर शेतकरी संघटनेच्या वतीने घाटगे यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर करवीर तालुका पूर्वभाग पत्रकार संघाच्या वतीनेही घाटगे यांचा सत्कार केला.

गळीत हंगाम २०२१- २२ च्या तोंडावर एफआरपीची रक्कम २ टप्प्यात की ३ टप्प्यात द्यावयाची, याबाबत चर्चा सुरू होती. एफआरपीची रक्कम एकरकमी मिळावी, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ‘जागर एफआरपी’चा अशी मोहीम सुरू केली होती. या दरम्यान घाटगे यांनी शाहू साखर कारखान्याची एफआरपी एकरकमी देण्यात येणार असल्याची घोषणा सर्वप्रथम केली होती.

यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सागर कोंडेकर यांच्यासह तालुकाध्यक्ष बाळासो पाटील, स्वाभिमानी पक्षाचे तालुकाध्यक्ष तानाजी मगदूम, अविनाश मगदूम प्रभु भोजे, पांडुरंग चौगुले, नितेश कोगनुळे, अनिल पाटील, बाबुराव सुतार, दीपक हेगडे आदी उपस्थित होते.