लोकसभेतील पराभवानंतर चिंतनाऐवजी राहुल गांधींंनी पळ काढला..!

सलमान खुर्शीद यांनी दिला घरचा अहेर

0 66

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभा निवडणुकांतील पराभव कशामुळे झाला यावर विचार करण्याऐवजी आमचा नेताच पळून गेला, हेच काँग्रेसच्या पिछाडीचे मुख्य कारण असल्याची खंत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी व्यक्त केली. राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारायला हवी, त्यानंच काँग्रेस पक्षाला उभारी येईल,असेही ते म्हणाले. नवी दिल्ली येथे ते पत्रकारांशी बोलत होते.

काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन राहुल गांधी यांनी जबाबदारीपासून पळ काढल्याचे आतापर्यंत दबक्या आवाजात बोलले जात होते. यावर सलमान खुर्शीद यांनी उघडपणे वक्तव्य केले.पुढे ते म्हणाले की, राजीनामा दिल्यानंतर राहुल पक्ष आणि कार्यकर्ते यांच्यापासून दूर राहिले. राहुल गांधी सक्रीय नसल्याने सोनिया गांधी यांना ही जबाबदारी घ्यावी लागली. मात्र ही केवळ तात्पुरती व्यवस्था आहे. राहुल गांधी यांच्या राजीनाम्यानंतर एक पोकळी निर्माण झाली.राहुल गांधी यांनी राजीनामा द्यायला नको होता. त्यांनी पदावर कायम राहायला पाहिजे होते आणि नेतृत्व करायला हवे होते. कार्यकर्त्यांना देखील हेच वाटत असल्याचे  खुर्शीद यांनी सांगितले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More