विशाखापट्टण (वृत्तसंस्था) : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खानने आयएनएस विशाखापट्टणमध्ये जाऊन भारतीय नौदलाच्या जवानांची भेट घेतली आहे. यावेळी सलमानने सैनिकांसोबत संवाद साधला. त्याने आयएनएस विशाखापट्टणम ही युद्धनौका पाहिली. त्याने यावेळी सैनिकांसोबत पुशअप्स मारले, कुकिंग केले आणि वर्कआऊट देखील केला. सलमानने आयएनएस विशाखापट्टणमवर तिरंगा फडकवला. उपस्थित सैनिकांनी सलमानचा ऑटोग्राफ देखील घेतला. सैनिकांची देशभक्ती आणि धैर्य पाहून सलमान भारावून गेला.

आयएनएस विशाखापट्टनम माझगाव डॉकयार्डमध्ये तयार करण्यात आली आहे. आयएनएस विशाखापट्टम १६३ मीटर लांब आणि ७४०० टन वजनाची आहे. यामध्ये सर्फस टु एअर मिसाईल, ब्रह्मोस, टोरपीडो ट्यूब लॉचर, अँटी सबमरीन रॉकेट लॉचर, बीएचईएलची ७६ एमएम सुपर रॅपिड सारखी हत्यारे आहेत. आता भारतीय नौदलात १३० युद्ध नौका आहेत. विशाखापट्टणम या युद्धनौकेची बांधणी स्वदेशी बनावटीच्या डीएमआर २९४ ए स्टीलचा वापर  करून केली आहे. भारतात बांधण्यात आलेली ती सर्वात मोठी युद्धनौका आहे.