‘सैराट’ फेम आर्ची झळकणार हिंदी चित्रपटात..

0
501

मुंबई (प्रतिनिधी) : ‘सैराट’ चित्रपटाच्या माध्यमातून सगळ्यांना वेड लावणारी अभिनेत्री रिंकू राजगुरूने तिचा अभिनयाचा मोर्चा आता हिंदी चित्रपट सृष्टीकडे वळवला आहे. रिंकूने सैराटच्या यशानंतर कधीही मागे वळून पाहिले नाही. ‘सैराट’ फेम आर्ची  आता ‘हंर्डेड’ या हिंदी वेबसीरिजनंतर ऍमेझॉनवरील ‘अनपॉज्ड’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गुरुवारी ऍमेझॉन प्राईमने ‘अनपोज्ड’ या पाच शॉर्ट फिल्मचा टीझर रिलीज केला.

या चित्रपटात रिंकू एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. ‘अनपॉज्झ’मध्ये पाच शॉर्ट फिल्म्स एकत्र असणार आहेत. सोशल मीडियावर चित्रपटाचा टीझर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. राज अँड डीके, निखील अडवाणी, तनिष्ठा चॅटर्जी, अविनाश अरूण आणि नित्या मेहरा अशा पाच गुणवंत दिग्दर्शकांनी दिग्शर्दित केलेल्या शॉर्ट फिल्म्स या चित्रपटात दाखवल्या जाणार आहेत. १८ डिसेंबरला हा वेगळ्या थाटणीचा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.