साजणी येथील माजी सैनिक सदाशिव शेडबाळे यांचे निधन

0
58

कोल्हापूर (प्रतिनिधी) : साजणी (ता. हातकणंगले) येथील सुभेदार सदाशिव मारुती शेडबाळे (वय ८०) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने साजणी गावावर शोककळा पसरली आहे.

सुभेदार शेडबाळे १९६१ मध्ये लष्करी सेवेत भरती झाले होते. त्यांनी १९६१ ते १९८६ अशी २५ वर्षे लष्करात सेवा बजावली. या काळात त्यांनी १९६१ गोवा, १९६२ चीन लढाई, १९६५ च्या पाकिस्तान लढाईत सहभाग घेतला होता. त्यांच्या हयातीत ते देशसेवेबद्दल लोकांच्यात जागृती करणे आणि देशसेवेची गरज लोकांना समजावून सांगत असत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, मुली,   नातवंडे असा परिवार आहे.