सदाभाऊ म्हणतात, पडळकर मंत्री होतील

0
52

सांगली (प्रतिनिधी) : आमदार गोपीचंद पडळकर टीव्हीवर आले की आज हा माणूस कुणाला काय बोलणार हे बघण्यासाठी लोक टीव्हीसमोर थांबतात. त्यामुळे पडळकर आता मंत्री पदासाठी तुमचाच नंबर आहे. तुम्ही शंभर टक्के मंत्री होणार आहे. गोपीचंद पडळकर यांचा सध्या महाराष्ट्रामध्ये टीआरपी जास्त आहे, अशी स्तुतीसुमने माजी राज्यमंत्री आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी पडळकरांवर उधळली.

हिंदकेसरी पै.मारुती माने यांच्या ८३ व्या जयंतीनिमित्त पै.भीमराव माने युथ फाऊंडेशन व हिंदकेसरी व्हॉलीबॉल स्पोर्ट्स क्लब कवठेपिरान यांचे वतीने व्हॉलीबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रमुख उपस्थिती होती. यावेळी खोत बोलत होते.

खोत म्हणाले, गोपीचंद बारका गडी पण अख्खा महाराष्ट्र त्यांना ओळखतो. लेनन गाडी कितीही मोठी असू द्या पण एवढ्या एवढ्या जॅकवर ती गाडी उचलली जाते, असे गोपीचंद पडळकराचे काम आहे. आम्ही चुकून आमदार झालोय. मला आमदारकी कशी मिळालीय हे सगळ्यांना माहीत आहे. इडा पीडा टाळू आणि सदाभाऊंना आमदारकी मिळू दे’ असे मी आमदार झालोय.