मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढू लागला आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली असून रविवारपासून रात्रीचा कर्फ्यू लावण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकर यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ही माहिती दिली आहे.

सचिनने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मला सौम्य लक्षणे आढळली आहेत.  माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी काळजी घेत आहे. सर्वांनी काळजी घ्यावी. दरम्यान, सचिनच्या कुटुंबातील इतर सदस्यांनीदेखील कोरोना चाचणी केली.  सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.