मुंबई (प्रतिनिधी) : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी अखेर रुपाली चाकणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारने त्यांच्या नियुक्तीचा आदेश जारी केला आहे. रुपाली चाकणकर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा आहेत. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून महिला आयोगाचं अध्यक्षपद रिक्त होतं. अखेर या पदावर चाकणकर यांचे नाव शिक्कामोर्तब करण्यात आले.

रुपाली चाकणकर या आपल्या आक्रमक भाषणशैलीने ओळखल्या जातात. चित्रा वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर रुपाली चाकणकर यांना राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्षपदाची संधी मिळाली. रुपाली चाकणकर यांनी राज्यभरात राष्ट्रवादी महिला संघटन मंजबूत करण्यासाठी प्रयत्न केले आहेत.