गोकुळ चांगला चालवा, कोणावरही अन्याय होऊ नये..! – रवींद्र आपटे

0
1263

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गोकुळची निवडणूक नुकतीच झाली सत्तांतर झाल्यानंतर माजी चेअरमन रवींद्र आपटे यांची नुकतीच विद्यमान संचालक विश्वास पाटील आणि अरुण डोंगळे यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्या भेटीची चर्चा आता संपूर्ण जिल्ह्यात सुरु आहे. यावेळी गोकुळ चांगल चालवा कोणावर अन्याय होऊ नये अशी अपेक्षा आपटे यांनी व्यक्त केली.

गोकुळच्या निकालानंतर सत्तांतर झाले यामुळे आपल्या जुन्या सहकाऱ्यांचे अभिनंदन करण्यासाठी आपटे यांनी त्यांना फोन केला होता. त्याचवेळी पाटील यांनी आम्ही भेटायला येणार आहे असे त्यांना सांगितले. आपटे यांच्या तब्बेतीची चौकशी आणि त्यांची भेट घेण्यासाठी डोंगळे आणि पाटील काल (शुक्रवारी) संध्याकाळी आपटे यांच्या घरी भेट दिली.

यावेळी आपटे यांनी गोकुळ ‘आतापर्यंत चांगला चालविला आहे येथून पुढेही तो चांगला चालवा कोणावरही अन्याय होऊ देऊ नका हे बघा..! याचबरोबर राजकारणाच्या पलीकडे आमची मैत्री आहे. इथून पुढेही आमची मैत्री अशीच राहील असे आपटे यांनी लाईव्ह मराठीशी बोलताना सांगितले. या तिघांच्या भेटीने जिल्ह्यात मात्र चांगलीच चर्चा झालीय.