सरसंघचालकांकडून मोदी सरकारचे कौतुक…

नागपुरात दसरा मेळावा संपन्न

0 59

नागपूर (प्रतिनिधी) : जम्मू काश्मीरमधून कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय एकट्या सरकारचा नाही. तर तो सर्वच पक्षांच्या पाठिंब्यामुळेच घेतला. धाडसी निर्णय घेण्याची क्षमता मोदी सरकारमध्ये आहे.  त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह सर्वांचच अभिनंदन व्हायला हवं अशा शब्दात सरसंघचालक मोहन भागवत यांनी कौतुक केले. नागपूरमधील रेशीम बागेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते. 

भागवत म्हणाले की, काश्मीरी पंडितांचं पुनर्वसन, रोजगार निर्मिती झाली पाहिजे. हिंदूंत्वाविषयी बोलणे म्हणजे मुस्लीमांना विरोध करणं असं नाही,”

जनतेनं पुन्हा भाजपावर विश्वास दाखवला. लोकशाहीत जनतेच्या मतांवर शासन चालतं. लोकशाही भारताला नवीन नाही. प्राचीन काळापासून ही व्यवस्था भारतात होती. लोकशाही आम्ही पश्चिमी देशांकडून घेतली असं पश्चिमी राष्ट्रांनी हे समजू नये,” असे मतही त्यांनी व्यक्त केले.

या मेळाव्याला एचसीएलचे संस्थापक आणि अध्यक्ष पद्मभूषण शिव नाडर हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी, माजी लष्करप्रमुख व्ही.के.सिंगदेखील संघाच्या दसरा मेळाव्याला उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More