नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्वसामान्यांना आणखी एक धक्का बसला आहे. सरकारी तेल विपणन कंपन्यांनी विनाअनुदानित १४.२ किलोच्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात २५  रुपयांनी वाढ केलीय. ही वाढ २५ फेब्रुवारीपासून लागू झाल्या आहेत. त्यामुळे दिल्लीत आता विनाअनुदानित एलपीजी सिलिंडरची किंमत आता ७९४ रुपये झालीय.

फेब्रुवारीमध्ये एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीतील ही तिसरी वाढ आहे. यापूर्वी ४ फेब्रुवारीला 25 रुपयांची वाढ झाली होती, १४ फेब्रुवारीला ५० रुपयांची वाढ झाली होती.  २५ फेब्रुवारीला त्यात २५ रुपयांची वाढ झालीय. म्हणजेच या महिन्यात एलपीजीच्या किमतीत १०० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार हे नक्की…