बेळगावमध्ये १९ पासून ‘रोटरी यूथ लिडरशिप’ उपक्रम…

0
87

कोल्हापूर (प्रतिनिधी) : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर आणि रोटरॅक्ट क्लब ऑफ कोल्हापूर यांच्या विद्यमाने बेळगावमध्ये १९ ते २१ फेब्रुवारी या कालावधीत ‘रोटरी यूथ लिडरशिप’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे हे ९ वे वर्ष आहे. तर या वर्षी Spiceing up with roots ही थीम ठेवण्यात आली असल्याची माहिती रोटरॅक्ट क्लब ऑफ कोल्हापूरचे  अध्यक्ष अभिजित पाटील यांनी आज (गुरुवार) पत्रकार परिषदेत दिली.

दरवर्षी या उपक्रमातून नवीन लीडर तयार केले जातात. तर १५ प्रकारचे अॅवार्ड दिले जातात. या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्याना ४८०० रु. फी असून १८ ते ३० वयोगटातील युवकांना यामध्ये सहभागी होता येतं.तर यामध्ये युवा वर्गाच्या सर्वागीण विकासाच्या संकल्पना अंतर्गत नेतृत्वाची मूलभूत तत्त्वे, सकारात्मक नेतृत्व व नीतीमत्ता,  प्रभावी नेतृत्वात संवाद कौशल्याचे महत्व, समस्या सोडवणे आणि संघर्ष व्यवस्थापन, आणि समाजसेवा, आत्मविश्वास तसेच स्वाभिमान निर्माण करणे, सामुदायिक आणि जागतिक नागरिकत्वाचे घटक या बाबींवर या उपक्रमामध्ये भर दिला जाणार असल्याचे या वेळी अभिजित पाटील यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेला प्रकल्प अधिकारी प्रत्युफ दोषी, खजानिस यश पारेख, अक्षय पुरोहित, जयेश गांधी, प्रदीप पासमल, साहिल गांधी उपस्थित होते.