रोटरी क्लबच्यावतीने कुंभोज येथील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप…

0
143

कुंभोज (प्रतिनिधी) : सर्वसामान्य विद्यार्थ्याचे आरोग्य, शिक्षण उत्तम  करण्यासाठी रोटरी क्लबच्या माध्यमातून आपण लागेल ते प्रयत्न करू. असे रोटरी क्लबचे ट्रस्ट चेअरमन नेमिनाथ कोथळे यांनी सांगितले. ते हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथे रोटरी क्लब ऑफ इचलकंजीच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्य आणि सायकल वाटपावेळी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रकाश रावळ होते.

यावेळी कुंभोज परिसरातील अकरा शालेय विद्यार्थ्यांना शालेय पुस्तके, वह्या, शालेय साहित्य आणि सायकलचे वाटप करण्यात आले. कुंभोजचे माजी सरपंच प्रकाश पाटील यांनी रोटरी क्लबकडे शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य पुरविण्यासाठी मागणी केली होती.

यावेळी सेक्रेटरी संजय घायतिडक, डायरेक्टर सागर पाटील, रावसाहेब पाटील. श्रीकांत गुंडवडे, राजु मुजावर, विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते.