शिवनाकवाडी येथील न्यू हायस्कूल शाळेला रोटरी क्लबचा पुरस्कार…

0
182

कोल्हापूर (प्रतिनिधी) : रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंटरच्या वतीने हॅप्पी स्कूल उपक्रम राबवण्यात येत आहे. शिरोळ तालुक्यातील शिवनाकवाडी येथील न्यू हायस्कूल शाळेला ‘संत गाडगेबाबा स्वच्छ व सुंदर शाळा’ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी चेअरमन नरिदर बरवाल, लिटरसी कौन्सलर किशोर लुल्ला यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.  

रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंटरच्या सहकार्यातून या शाळेमध्ये अनेक शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. या शाळेमध्ये अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. तसेच रोटरीच्या वतीने एलईडी टीव्ही शाळेला भेट देण्यात आला आहे. यावेळी सहाय्यक प्रांतपाल सुमती अग्रवाल, मुख्याध्यापक विजय जाधव,  शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.