मुंबई (प्रतिनिधी) : जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर  माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे नवीन गाणं रिलीज झाले आहे. कुणी म्हणालं वेडी कुठली, कुणी म्हणालं खुळी, असे अमृता फडणवीस यांच्या नव्या गाण्याचे बोल आहेत. या गाण्याचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी एक ट्विट करून कौतुक केले आहे.  

रोहित पवार म्हणतात की,  काही लोकांना सहज तर काहींना प्रयत्न करूनही संधी मिळत नाही. ज्यांना सहज संधी मिळते ते या संधीचा योग्य वापर करतातच असं नाही, पण अमृता फडणवीस ताई मिळालेल्या संधीचा वापर करत आपण गाण्याची आवड जोपासण्याचा जो प्रयत्न करता त्याचा आदर वाटतो. अशीच आवड जोपासा. आपल्याला मनापासून शुभेच्छा.

दरम्यान, अमृता फडणवीस यांनी गायलेल्या गाण्याची निर्मिती टी-सिरीजने केली आहे. नाट्य संगीतावर आधारित असलेल्या या गाण्यात भावनांच्या या जगतात गडबडले मी गडगडले, असा उल्लेख आहे. काही दिवसांपूर्वी ट्रोलर्सना तयार राहण्याचाही इशाराही त्यांनी दिला होता. माझं आणखी एक गाणं येतं आहे. मी ट्रोलर्सना या गाण्यातून उत्तर देईन, असे अमृता फडणवीस यांनी म्हटले होते.