कुंभोज (प्रतिनिधी) : येथील रोहित मोहन जाधव यांची सचिवालय विधानभवन मुंबई येथे कक्ष अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी ते सचिवालय विधानभवन मुंबई येथे सहायक कक्ष अधिकारी म्हणून कार्यरत होते.

या निवडीबद्दल कुंभोज ग्रा.पं. च्या वतीने जाधव यांचा सरपंच अरुणादेवी पाटील, उपसरपंच अनिकेत चौगुले, महाविकास आघाडीचे गटनेते किरण माळी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. रोहित जाधव म्हणाले, विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपले उच्च ध्येय गाठणे गरजेचे आहे. कुंभोज गावच्या सर्वांगीण विकासासाठी मंत्रिमंडळ स्तरावर कोणतेही काम करण्यासाठी आपण बांधिल आहे.

अध्यक्षीय भाषणात सरपंच अरुणादेवी पाटील यांनी रोहित जाधव यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी ग्रा.पं. सदस्य दावेद घाटगे, सदाशिव महापुरे, सुधीर कांबळे, आप्पासाहेब पाटील रावसाहेब पाटील, जयश्री जाधव, विशाखा माळी, भारती पोतदार, माधुरी घोदे, लखन भोसले, संभाजी मिसाळ अशोक आरगे, धनाजी तिवढे, ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत दळवी, सुदर्शन चौगुले, श्रीकांत पालके आदी उपस्थित होते.