आळतेतील रस्त्यांची कामे मार्गी लावणार : आ. राजूबाबा आवळे

0
225

हातकणंगले (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील आळते येथील रस्त्यांची कामे तातडीने मार्गी लावली जातील, असे आमदार राजूबाबा आवळे यांनी आज (सोमवार) येथे सांगितले. येथील प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र धुळोबा देवालयाकडे जाणाऱ्या रस्त्याचे उद्घाटन आमदार आवळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

राजुबाबा आवळे म्हणाले की, या भागातील नागरिकांना व धुळोबा परिसरात येणाऱ्या भाविकांना खराब रस्त्यामुळे त्रास होत होता. त्यामुळे रस्त्यांची कामे लवकर करून हा त्रास कमी करण्याचा माझा प्रयत्न राहील. यावेळी बाळगोंडा पाटील, पं.स.सदस्य प्रविण जनगोंडा, हाजी शकिल अत्तार, मोहन कोळेकर, जावेद मुजावर, सुकुमार कोठावळे, आप्पासो पाटील, अशोक पाटील, गुलाब मुल्लाणी, आप्पासो मगदूम, वडेर गुरूजी, जयसिंग कांबळे आदीसह गोरे मळ्यातील नागरिक उपस्थित होते.