उषाराजे हायस्कूलच्या रिया पाटीलने पटकावले सुवर्णपदक….  

0 242

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ताराराणी विद्यापीठाच्या उषाराजे हायस्कूलची विद्यार्थिनी रिया पाटील हिने अलवर (राजस्थान) येथे झालेल्या अथलेटिक्स स्पर्धेत विविध गटात सुवर्णपदक पटकावले. ती उषाराजेची एक्सप्रेस ठरली आहे.

राजस्थानमधील अलवर येथे नुकतीच ३१ वी पश्चिम विभागीय राष्ट्रीय चॅम्पियन अथलेटिक्स स्पर्धा झाली. या स्पर्धेत रियाने २००, ४०० मीटर आणि मिडले रिले प्रकारात प्रथम क्रमांक मिळविले.  तिला प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.

रिया ही गरीब कुटुंबातील असून अत्यंत कष्टाने तिने हे यश संपादन केले आहे. तिला क्रीडा प्रशिक्षक एस. के. मासाळ यांचे मार्गदर्शन आणि संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. क्रांतीकुमार पाटील, मुख्याध्यापिका ए. यु. साठे, एस. डी. चौधरी, पर्यवेक्षक व्ही. डी. जमेनिस एस. के. मिठारी यांचे प्रोत्साहन लाभले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More