सावरवाडी (प्रतिनिधी) : गेल्या आठवड्यापासून करवीर तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामातील भात पीकांच्या कापणी, मळणीच्या कामांची सर्वत्र धांदल उडाली आहे. पावसाची चांगली साथ मिळाल्याने भात पिकांच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

यामध्ये भात पीकाची कापणी करणे, भात झोडणे, पिंजर वाळविणे, भात वाळविणे यासारखी कामे सुरू झाली आहेत. त्याचबरोबर बदलत्या काळानुसार खळ्यावरील भात पीकांची मळणी आता संपुष्टात आली आहे. शेतकरी आता कामात मग्न असल्याचे चित्र ग्रामीण भागात पहावयास मिळत आहे.