दानवेंची जीभ छाटणाऱ्यास १० लाखांचे बक्षीस : संतोष ढवळे

0
162

यवतमाळ (वृत्तसंस्था) : संपूर्ण राज्यभरातून पेट्रोल-डिझेल दरवाढ आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या वादग्रस्त वक्तव्याबाबत असंतोष व्यक्त केला जात आहे. यातच यवतमाळ जिल्ह्यात शिवसेना रस्त्यावर उतरली आहे. दानवे हे शेतकरी विरोधी नेते असून शेतकऱ्यांचा वारंवार अपमान करणाऱ्या दानवे यांची जीभ छाटणाऱ्यास १० लाख रुपये बक्षीस आणि लोकवर्गणीतून मिळालेले चारचाकी वाहन भेट देऊ, अशी घोषणा यावेळी शिवसेना माजी जिल्हाप्रमुख संतोष ढवळे यांनी केली. 

दत्त चौकात झालेल्या या आंदोलनात रावसाहेब दानवे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी आणि पुतळ्याला चपलांनी बदडल्यानंतर त्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवसैनिक आणि पोलिसात चांगलीच झटापट देखील झाली.

मला ही गाडी शेतकऱ्यांच्या मुलांनी लोकसहभागातून दिलीय. दानवे जर शेतकऱ्यांचा अपमान करत असतील तर याची गरज काय ? दानवेंची जीभ कापणाऱ्यास ही गाडी मी भेट देईन तसेच १० लाखाच बक्षीस देईन, असे संतोष ढवळे म्हणाले.