कोल्हापूर (प्रतिनिधी) : यंदा हवामान विभागाने सुमारे 98 टक्के इतका पावसाचा अंदाज वर्तविला आहे. पश्मिच महाराष्ट्रातील विशेषत: सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्याला पुराच्या पाण्याचा प्रश्न भेडसावतो आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी येत्या 31 मे रोजी वाजता झुम ॲपवर या तिन्ही जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, जलसंपदा विभागाचे प्रमुख अधिकारी तसेच महसूल यंत्रणेच्या इतर अधिकऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली.

कोयनेच्या परिक्षेत्रात पडणाऱ्या अति पावसामुळे आणि त्यामुळे येणाऱ्या पुरामुळे या तिन्ही जिल्ह्याचे होणारे आर्थिक आणि मानवी नुकसान होत आहे. यासाठी 31 मे रोजी सकाळी 11 वाजता झुम ॲपवर या तिन्ही जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, सर्व जिल्हाधिकारी, जलसंपदा विभागाचे प्रमुख अधिकारी तसेच महसूल यंत्रणेच्या इतर अधिकऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली.