रांगडा राणादा पाठकबाईसोबत पुन्हा एकत्र…

0
206

मुंबई (प्रतिनिधी) : झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेने मराठी प्रेक्षकांच्या मनावर चांगलेच गारूड घातले होते. ग्रामीण भागातील वागणं बोलणं, बोलण्यातील ग्रामीण बाज यामुळे मुख्य कलाकार राणादा अल्पावधीतच प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला होता. आता पाठकबाईसोबतचा राणादाचा रांगडा लूक असलेले फोटो समोर आले आहेत.   

अभिनेता हार्दिक जोशी याने राणादाची भूमिका साकारली होती. तर सालस शिक्षिकेच्या भूमिकेत झळकणारी अभिनेत्री अक्षया देवधर हिने पाठकबाईंची भूमिका साकारली होती. ही मालिका आता बंद झाली असली तरी, हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांनी एकत्र एक फोटोशूट केले आहे.

यात अक्षया देवधरने छान रंगीबेरंगी साडी घातली आहे. तर हार्दिक जोशीने पांढऱ्या रंगाची धोती आणि हिरव्या रंगाचा शर्ट परिधान केला आहे. त्यासोबत राणादाने पगडी, गळ्यात माळ आणि कोल्हापुरी चप्पलही घातली आहे. हार्दिक जोशी आणि अक्षया देवधरने त्यांचे हे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत.