गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लज येथील प्रांत कार्यालयासमोर गेले तीन दिवस ‘गोड साखर’ च्या निवृत्त कर्मचाऱ्यांचे माजी जि.प. सदस्य शिवाजी खोत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन चालू आहे.

यावेळी खोत म्हणाले की, हा कारखाना शेतकऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या मालकीचा असून आम्ही आमच्या हक्काचे पैसे मागतोय. कर्मचाऱ्यांचे कारखान्याकडे १७ कोटी रुपये थकीत असून ते लवकरात लवकर मिळावे. आता निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना ३० दिवसाच्या आत पेन्शन द्यावी. आता पर्यंत ३०० कर्मचारी निवृत्त झाले असून त्यातील ५० ते ५५ कर्मचारी मयत झाले आहेत. तसेच अनेक कर्मचारी यांना आजारी आहेत.आमच्या हक्कचे दाम आम्हाला मिळालेच पाहिजे अशी मागणी  कारखान्याच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी कारखाना प्रशासनाकडे केली असल्याचे सांगितले.