लाईव्ह मराठी’ घरगुती गणेश सजावट स्पर्धेचा निकाल उद्या..! कोण होणार सर्वोत्कृष्ट व्हायरल बाप्पा..?

0
401

कोल्हापूर : ‘तेजस एंटरप्रायजेस सॅनिटायझिंग सर्व्हीसेस’ प्रस्तुत जिल्ह्यातील आघाडीचे न्यूज वेबपोर्टल ‘लाईव्ह मराठी’ घरगुती गणेश सजावट स्पर्धेचा निकाल उद्या (गुरुवारी) लागणार आहे. भाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांची निकालाची प्रतीक्षा आता संपली आहे. ‘लाईव्ह मराठी’तर्फे शहर तसेच आजूबाजूच्या गावांसाठी घरगुती गणेश सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये १२०० च्या वर स्पर्धकांनी उस्फुर्तपणे सहभाग नोंदविला होता.

शहरामध्ये ज्या प्रभागात प्रायोजक आहेत अश्या ठिकाणी प्रभागनिहाय निकाल दिला जाणार आहे. तेथील स्पर्धकांना त्या प्रायोजकाकडून बक्षिसे देण्यात येणार आहेत. तर लाईव्ह मराठीतर्फे सर्व शहर आणि परीसरासाठी मुख्य ५ तर उत्तेजनार्थ बक्षिसेही जाहीर करण्यात येणार आहेत. ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या स्पर्धेसाठी सर्वच स्तरातून चांगला प्रतिसाद मिळाला.

स्पर्धेची मुदत संपल्यानंतर स्पर्धकांनी लाईव्ह मराठीच्या या अनोख्या स्पर्धेच्या निकालाची उत्कंठा वाढली असल्याचे बोलून दाखविले. पण काही स्पर्धकांनी आपल्या पोस्टला ‘ऑटो लायकर’ सारखे अॅप वापरून आपली लाईक चुकीच्या पद्धतीने वाढविल्याचे लक्षात आले आहे. स्पर्धेला टेक्नीकल सपोर्ट देणाऱ्या ‘मिडियाटेक’ यांच्याकडून प्रत्येक व्हिडीओची काटेकोरपणे पाहणी सुरु आहे. या सर्व परीक्षणातून सर्व स्पर्धकांना पार पडावे लागणार आहे.

स्पर्धेच्या पारदर्शक निकालासाठी लाईव्ह मराठी, कोल्हापूर फेस्टीव्हल डॉट कॉम आणि मिडियाटेक बांधील असून हि कठीण प्रक्रिया पार पाडूनच उद्या या सर्वात मोठ्या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे याची सर्व सहभागी स्पर्धकांनी नोंद घ्यावी.