लाईव्ह घरगुती गणेश सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर..!

0
2069

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ‘तेजस एंटरप्रायजेस सॅनिटायझिंग सर्व्हीसेस’ प्रस्तुत ‘लाईव्ह मराठी’ घरगुती गणेश सजावट स्पर्धेचा निकालाची उत्कंठा संपली आहे. प्रभाग क्रमांक 74 सानेगुरुजी वसाहत येथील प्रसन्न प्रितम बुलबुले यांचा संपूर्ण शहरामध्ये सर्वोत्कृष्ट व्हायरल बाप्पा ठरला आहे.

या स्पर्धेमध्ये दुसरा क्रमांक प्रभाग क्रमांक 47 फिरंगाई यशस्वीनी माने यांचा तर तिसरा क्रमांक प्रभाग क्रमांक 47 मधील ओंकार खोत, चौथा क्रमांक प्रभाग क्रमांक 43 शास्त्रीनगर-जवाहरनगर ओंकार गुहागरकर यांचा तर पाचवा क्रमांक प्रभाग क्रमांक 74 सानेगुरुजी वसाहत सुमीत राऊत यांनी पटकावला आहे.

या स्पर्धेला मिळालेला प्रतिसाद पाहता लाईव्ह मराठीतर्फे आणखी 20 उत्तेजनार्थ बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत.

ती अशी – शिवतेज पवार प्रभाग 73 फुलेवाडी-रिंगरोड, सुहास गायकवाड प्रभाग क्र. 47 फिरंगाई, स्वप्निल जाधव, आशिष माने प्रभाग ४६ सिद्धाळा गार्डन, अजय जाधव प्रभाग क्रमांक 47 (फिरंगाई), स्वरुप शिंदे प्रभाग क्रमांक 50 (पंचगंगा तालीम), अवधूत कणसे प्रभाग क्रमांक 8 (भोसलेवाडी- कदमवाडी), विशाखा निकमप्रभाग क्रमांक 53 (दुधाळी पॅव्हेलियन), अविनाश सातार्डेकर इतर उपनगरे व ग्रामीण भाग अमर देसाई उचगांव, किशोरी पसारे प्रभाग क्रमांक 37 (राजारामपुरी तवनाप्पा पाटणे हायस्कूल), अमित शिंदे प्रभाग क्रमांक 26 (कॉमर्स कॉलेज), मोहन पाटोळे प्रभाग क्रमांक 74 (सानेगुरूजी वसाहत), साहिल कराळे प्रभाग क्रमांक 81 (क्रांतीसिंह नाना पाटीलनगर, जीवबा नाना पार्क), सुरज जाधव प्रभाग क्रमांक 37 (राजारामपुरी तवनाप्पा पाटणे हायस्कूल), मनिष कारंजकर प्रभाग क्रमांक 57 (नाथा गोळे तालीम), गौरी कारंजकर प्रभाग क्रमांक 57 (नाथा गोळे तालीम), स्वप्नील पोवार प्रभाग क्रमांक 43 (शास्त्रीनगर-जवाहरनगर), अमर भोसले प्रभाग क्रमांक 46 (सिध्दाळा गार्डन), महेश पाटील प्रभाग क्रमांक 74 (सानेगुरूजी वसाहत) अशी आहेत.

लाईव्ह मराठी, कोल्हापूर फेस्टिव्हल्स डॉट कॉम आणि मिडीया टेक यांच्यावतीने ही अनोखी स्पर्धा घेण्यात आली होती. डिजीटल प्लॅटफॉर्मवरील ही सर्वात लोकप्रिय अशी स्पर्धा ठरली. या स्पर्धेमध्ये 1200 च्यावर स्पर्धकांनी उस्फुर्तपणे सहभाग नोंदविला होता. लाईव्ह मराठीतर्फे आज हा निकाल जाहीर करण्यात आला असून सर्वात जास्त लाईक्स् मिळवणाऱ्या स्पर्धकांना बक्षीसपात्र ठरविण्यात आले आहे.

या स्पर्धेमध्ये मुख्य प्रायोजकत्व देणारे ‘तेजस एंटरप्रायजेस सॅनिटायझिंग सर्व्हीसेस’, प्रभागामध्ये प्रायोजकत्व देणारे माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, माजी स्थायी समिती सभापती सचिन चव्हाण,  माजी नगरसेविका जयश्री सचिन चव्हाण, माजी उपमहापौर रविकिरण इंगवले, माजी नगरसेविका तेजस्विनी इंगवले, महेश उत्तुरे, माजी परिवहन सभापती प्रतिज्ञा महेश उत्तुरे, माजी परिवहन सभापती नियाज खान, जाहिदा नियाज खान, स्वप्निल सावंत, गौरी स्वप्निल सावंत, नंदकुमार पिसे, डॉ. अमोल बावडेकर, सोमनाथ बोळाईकर, सुषमा संतोष जाधव, धनश्री गणेश जाधव, अजित पवार, माजी ग्रा. प सदस्य दत्तात्रय तोरस्कर या सर्व प्रायोजकांचे लाईव्ह मराठी परिवारतर्फे आभार. या प्रायोजकांनी प्रायोजाकत्व घेतलेल्या प्रभागामध्ये त्यांच्याकडून वेगळी वैयक्तिक बक्षिसे देण्यात येतील याचीही नोंद स्पर्धकांनी घ्यावी.

महत्वाचे – या स्पर्धेमध्ये काही स्पर्धकांनी चुकीच्या पद्धतीने तंत्रज्ञानाचा वापर करून पुढे जाण्याचा प्रयत्न केला आहे. अश्या स्पर्धकांना संयोजकांनी बाद ठरवले आहे. याची सर्वांनी नोंद घ्यावी.