मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सप्टेंबर-ऑक्टोबर २०२१ मध्ये घेतलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (दहावी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) पुरवणी परीक्षेचा निकाल बुधवारी (दि.२०) दुपारी १ वाजता जाहीर करण्यात येणार आहे.

हा निकाल www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असून या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुण पाहता येणार आहेत.

पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत दहावीची पुरवणी परीक्षा दिनांक २२ सप्टेंबर, २०२१ ते ८ ऑक्टोबर २०२१ व बारावीची पुरवणी परीक्षा दिनांक १६ सप्टेंबर २०२१ ते १२ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत घेण्यात आली होती.