कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोना काळात रक्ताचा तुटवडा जाणवू लागला आहे. ही बाब लक्षात घेऊन अब्दुललाट येथील झेंडा चौक तरूण मंडळाने आज (सोमवार)  महारक्तदान शिबिराचे आयोजन केले. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कुरुंदवाड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भांगे, अब्दुललाट मतदार संघातील जिल्हा परिषद सदस्य विजय भोजे, चैतन्य शिक्षण समाजाचे दशरथ काळे, संजय आवळे, मनोज शेडबाळे, माजी पंचायत समिती सभापती विद्याधर कुलकर्णी, ऋषभ कोळी, अब्बास नदाब, दादा पाटील, रमेश चव्हाण, शरद पाटील, योगेश सुतार, आझाद शेख आदीसह गावातील सर्व मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.