जयश्री दानवे यांच्या कथा अभिवाचनास प्रतिसाद

0
109

कोल्हापूर (प्रतिनिधी) : नवीन वाशी नाका ज्येष्ठ नागरिक संघ येथे ज्येष्ठ लेखिका जयश्री दानवे यांच्या कथा अभिवाचनाचा कार्यक्रम उत्साहात झाला. अभिवाचनाच्या कार्यक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमात लेखिका जयश्री दानवे यांनी ‘आई शूर अन भित्रीही’ अशी मातेची थोरवी सांगणारी कथा तसेच ‘बापता’ ही वडिलांची महती स्पष्ट करणारी कथा, ‘दिसतं तसं नसतं, दोन पावले, प्रतिमा, बंधनमुक्त गायन ही अकबर आणि तानसेन यांची गुरुची महती सांगणारी कथा, सावित्री-जोतिबांची कथा अन मनस्वी -निर्भेळ आनंद स्पष्ट करणारी कथा अशा जवळजवळ १० ते १२ कथांचे भावपूर्ण अभिवाचन करून श्रोत्यांची मने जिंकली.

यावेळी लेखिका जयश्री दानवे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास अध्यक्ष गणपतराव बागडी, संघाचे सर्वेसर्वा पांडुरंग कुलकर्णी (कौलवकर),  सदस्य व न्यू कॉलेजचे माजी प्राध्यापक संभाजी पाटील, ज्येष्ठ लेखक शाम कुरळे, राजदर्शन जयशंकर दानवे आणि रसिक उपस्थित होते.