मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनामुळे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा दि. ११ जून, २०२१ च्या शासन निर्णयानुसार रद्द करण्यात आली. त्यानंतर दि. २ जुलैच्या शासन निर्णयानुसार १२वी च्या परीक्षेसाठी मंडळाकडे नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करून त्यांना गुणपत्रक, प्रमाणपत्र देण्यासाठी सुधारित मूल्यमापन कार्यपध्दती निश्चित करण्यात आली आहे.

त्यानुसार मंडळामार्फत सदर मूल्यमापन कार्यपद्धतीच्या अमंलबजावणीबाबत तपशीलवार परिपत्रक, परिशिष्टे तयार करून दि. ५ जुलै रोजी पत्राद्वारे सर्व विभागीय मंडळे व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना पाठविण्यात आली असून त्यानुसार निकालाची कार्यवाही करण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालय येथे १२ वी परीक्षा सन २०२१ च्या संदर्भात रिट याचिका क्र.६२०/२०२१ दाखल करण्यात आलेली आहे. या याचिकेबाबत सर्वोच्च न्यायालयाने २४ जूनच्या निकालानुसार या परीक्षेचा निकाल सुधारित मूल्यमापन कार्यपध्दतीनुसार जाहीर झाल्यानंतर या निकालावर विद्यार्थ्यांना काही आक्षेप किंवा तक्रारी असतील तर त्याच्या निराकरणासाठी मंडळस्तरावर व्यवस्था निर्माण करण्याबाबत आदेश दिले आहेत.

त्यानुसार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत विद्यार्थ्यांना तक्रारीचे निराकरण करण्यासाठी मंडळामार्फत विभागीय मंडळस्तरावर तक्रार निवारण अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यासाठी तक्रार निवारण अधिकारी म्हणून विभागीय मंडळातील विभागीय सहसचिव हे काम पाहतील. तक्रार निवारण अधिकारी तथा विभागीय सहसचिव यांचे पत्ते, दूरध्वनी क्रमांक व ई-मेल आयडी खालीलप्रमाणे आहेत.

टेलिफोन नंबर – 9689192899, 9403614142, 9922900825

ई-मेल आयडी – मंडळाचे पुणे, प्रिया शिंदे, सहसचिव पुणे विभागीय मंडळ, पुणे, माधुरी सहसचिव नागपूर विभागीय मंडळ नागपूर औरंगाबाद विभागीय मंडळ, औरंगाबाद राजेंद्र पाटील, सहसचिव मुंबई विभागीय मंडळ, मुंबई.

मेल आयडी –

sscboardpune@gmail.com, msboardnagpur@gmail.com, chair.aurboard@mahedu.gov.in औरंगाबाद, मुंबई, sichas mumbaiboard@gmail.com या मेल आयडीवरती विद्यार्थ्यांनी आपली तक्रार नोंदवावी असे आवाहन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केले आहे.