यड्राव येथील न्यू हायस्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात

0
53

इचलकरंजी (प्रतिनिधी) : यड्राव (ता.शिरोळ) येथील वि. दा. सावरकर शिक्षण संस्था, संचलित दि. न्यू हायस्कूल माध्यमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सल्लागार समितीच्या सदस्या डॉ. दीपा पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

कार्यक्रम प्रसंगी संस्थेच्या कार्यवाह सिंधुताई जाधव, सल्लागार समितीचे चेअरमन  टाकळे, सल्लागार समितीचे सदस्य पत्रकार विजयानंद माने, आप्पासाहेब पाटील, कदम, विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.