कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात…

0
81

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न झाला. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष रणजीत शाह यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.  त्यानंतर उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

रणजीत शाह म्हणाले यांनी, असोसिएशनतर्फे सभासद उद्योजकांसाठी विविध उपक्रम राबविले जात आहे.  नवीन उद्योजक निर्माण होण्यासाठी महाराष्ट् शासनाच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेची माहिती दिली. यामध्ये जास्तीत जास्त बेरोजगार, युवक, महिलांनी या योजनेत सहभागी होवून स्वतःचा व्यवसाय-उद्योग सुरू करावा असे आवाहन केले.  त्याच बरोबर इंजिनिअरिंग असोसिएशनमध्ये महिला उद्योजकांच्या समस्या सोडविण्यासाठी हा ग्रुप तयार करण्याचा प्रस्ताव मांडला. असोसिएशनतर्फे उद्योजक सभासदांना वॉटर एटीएम मशिनव्दारे दरमहा शंभर लिटर शुध्द पाणी पुरवठा मोफत केला जातो याचा सर्व सभासदांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले.

यावेळी भारत सरकारच्या सूक्ष्म,लघु,मध्यम उद्योग मंत्रालय, प्रॉडक्ट अॅण्ड प्रोसेस डेव्हलपमेंट सेंटर आग्रा,एक्स्टेशन सेंटर,कोल्हापूरचे, सह संचालक विकास वर्मा तसेच फिल्ड ऑफिसर प्रतिक पराशर, विजय पवार हे उपस्थित होते.  या सेंटर मार्फत विविध टे्निंग येत्या कांही दिवसात विद्याथ्र्यांना, कामगारांना देण्यात येणार आहेत त्यांची माहिती दिली. तसेच असोसिएशनचे कार्य खुप सुंदर सुरू असल्याच्या प्रतिक्रीया उपस्थितांनी दिल्या.

यावेली आ. चंद्रकांत जाधव, हर्षद दलाल, दिनेश बुधले, प्रसन्न तेरदाळकर, कमलाकांत कुलकर्णी, नितीन वाडीकर,श्रीकांत दुधाणे, अतुल आरवाडे, बाबासो कोंडेकर, अमर करांडे, जयदीप मांगोरे, चंद्रकांत चोरगे, हिंदूराव कामते, संजय पाटील,नरेंद्र माटे आदी मान्यवर उपस्थित होते.