गडहिंग्लज  (प्रतिनिधी) : केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२०’ आणि माझी वसुंधरा अभियानातर्गत गडहिंग्लज नगरपरिषदेतर्फे  हिरण्यकेशी नदीघाट येथे वडाच्या झाडाचे पुनर्रोपण करण्यात आले. माझी वसुंधरा अभियानातर्गंत जल, वायू, अग्नि, पृथ्वी, आकाश आदीसह प्रत्येक विषयाकरिता गुणांकन निश्चित  केले असून प्राप्त गुणांच्या आधारे नगरपरिषदांची क्रमवारी ठरविण्यात येणार आहे.

या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीच्या दृष्टीने हिरण्यकेशी नदीघाट येथे  दोन वडाच्या झाडांच्या खोडाची पुर्नलागवड करण्यात आली.  यावेळी नगराध्यक्ष स्वाती कोरी, उपनगराध्यक्ष महेश कोरी,  मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर,  सागर दादू पाटील तसेच नगरपरिषदेकडील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.