फुलेवाडी रिंगरोडवरील अनधिकृत केबिन्स हटवा : भाजपाची मागणी

0
21

कोल्हापूर (प्रतिनिधी) : प्रभाग क्र.२५ मध्ये महापालिकेच्या जागेवर अनधिकृत केबिन्स थाटल्या गेल्या आहेत. वाढत्या अतिक्रमण करून बसवलेल्या केबिनमुळे परिसराचे विद्रुपीकरण झाले आहे. परिसरातील या अनधिकृत केबिन्स त्वरित हटवाव्यात, अशी मागणी भाजपा शिवाजी पेठ मंडलाच्या वतीने महापालिका प्रशासक तथा आयुक्त कादंबरी बलकवडे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

भाजपा मंडल सरचिटणीस सचिन सुतार यांनी याबाबतची माहिती प्रशासकांसमोर मांडली. ओपन जिम, बाग, ज्येष्ठ नागरिकांना बसण्याच्या ठिकाणी अनधिकृत केबिन्स उभारण्यात आल्याने महापालिकेला यातून किती फायदा होतोय, असा सवाल उपस्थित केला. पदाधिकारी व स्थानिक नागरिकांनी या अनधिकृत केबिन्स प्रश्नी नागरिकांच्या हक्काच्या जागेवर अतिक्रमण होत असल्याबद्दल संताप व्यक्त केला. फुलेवाडी नाका ते आपटेनगर चौक या दरम्यान स्पीड ब्रेकर तसेच अमृत योजनेसाठी उकरलेल्या रस्त्यांचे पॅचवर्क करावे, अशीही मागणी केली आहे.

या निवेदनाची दखल घेत आयुक्त कादंबरी बलकवडे यांनी फुलेवाडी रिंगरोडवरील अनधिकृत केबिन्स हटविण्याचे व प्रभागातील इतर समस्या सोडविण्याचे आश्वासन नागरिकांना दिले. याबाबतच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष आल्या.

यावेळी भाजपा सरचिटणीस हेमंत आराध्ये, जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष गायत्री राऊत, मंडल अध्यक्ष गिरीष साळोखे, सरचिटणीस सचिन सुतार, अजित सूर्यवंशी, रोहित पवार, प्रकाश घाटगे, कोमल देसाई, शोभा कोळी, संदीप शिंदे, रंगराव पाटील, पांडुरंग चौगुले, रवींद्र घाटगे, तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.