कोल्हापूर (प्रतिनिधी) : अतिवृष्टीमुळे कोल्हापुर जिल्ह्यातील नदीपात्रात गाळ साठला आहे. हा गाळ काढण्यासंदर्भात शासकीय यंत्रणेची बैठक बोलविण्यात यावी. असे निवेदन खा. धैर्यशील माने यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना दिले.

निवेदनात म्हटले आहे की, गेल्या चार वर्षांपासून होणाऱ्या अतिवृष्टीमुळे वारणा, पंचगंगा, कृष्णा आणि कडवी नद्यांसह कोल्हापुर जिल्ह्यामधील इतर नदीपात्रांच्या पाणलोट क्षेत्रात गाळ तयार झालेला आहे. तो गाळ काढण्यासंदर्भात सविस्तर चर्चा करून त्याबाबतचा अहवाल तयार करणे, आणि तो शासन दरबारी पाठवणे यासाठी संबंधीत शासकीय यंत्रणेची बैठक तातडीने बोलवीण्यात यावी. तसेच काढलेल्या या गाळाचा उपयोग शेतकऱ्यांना जमिनी सुपिक करण्यासाठी होणार असल्याचे मत खा. माने यांनी व्यक्त केले.

यावेळी जिल्हाधिकारी रेखावार यांनी, खा. माने यांच्या या संकल्पनेचे कौतुक केले. आणि तत्काळ आपत्ती व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेऊन त्वरित संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्याच्या सूचना दिल्या.